केतकरांचे ‘ते विधान’ व महाराष्ट्राचे वर्तमान धर्मकारण
महाराष्ट्राचं धर्मकारण हे उत्तरेकडील गायपट्ट्यासारखं सरंजामी नसलं तरी त्यात इथल्या मातीतील खासा सरंजामीपणा निश्चित आहे. या सरंजामी वृत्तीची अभिव्यक्ती प्रतिगामी समजल्या जाणार्या वैचारिक, सांस्कृतिक वर्गातून ज्या रीतीनं दिसून येते, तशीच ती पुरोगामी म्हणवून घेणार्या वर्गातूनदेखील सर्रास मिरवली जाते. तोवर पुरोगामी असण्याच्या कितीही बाता मारल्या, तरी त्या बातांचं महत्त्व ‘बोलाच्या कढी’इतकंच असेल.......